आजीचं कुकरचं शिजवण – डिटॉक्सची गोष्ट
आजीचं कुकरचं शिजवण – डिटॉक्सची गोष्ट
सकाळी आजीचा कुकर शिट्टी वाजवत होता… बाजूच्या अंगणात बसलेले आजोबा म्हणाले, “आज काहीतरी खास वाटतंय ग, कायशिजतंय?”
आजी हसून म्हणाली, “आज मूगाचं पाणी आणि कोथिंबीर डिटॉक्स सूप. शरीराला हलकं करायचंय ना!”
गावाकडं detox म्हणायचं काही नव्हतं, पण आजीचं स्वयंपाकघर रोज शरीर शुद्धीचं काम करत असे. ती फक्त चवच नव्हे तर आरोग्यदेत असे.
आजचा उपाय:
एक वाटी हिरवे मूग रात्री भिजत ठेवा. सकाळी ते उकळून त्यात हळद, मीठ, थोडी कोथिंबीर आणि जिरे फोडणी घालून सूप तयार करा. आठवड्यातून एकदा प्या – शरीर शुद्ध होईल, त्वचाही उजळेल.

Comments
Post a Comment