हसणं, माया आणि थोडीशी हळहळ

 हसणं, माया आणि थोडीशी हळहळ



🪔 “कधी कधी औषध बाटलीत नसतं,

ते असतं आजीच्या हातात, आणि बहीणिच्या हास्यात!”



आज परीचा मूड खूप खराब होता. शाळेतल्या चित्रकलेच्या स्पर्धेत तिचं चित्र दुसऱ्या क्रमांकावर आलं होतं…

ती म्हणाली, “आज काहीही नको. ना खायला… ना बोलायला.”


आजीनं हळूच तिला मांडीवर घेतलं, आणि तिच्या केसात बोटं फिरवायला सुरुवात केली.

“बाळा, थोडं गार तेल डोक्यावर घालू का?”

परी काहीच बोलली नाही. पण डोकं सरकवून आजीच्या मांडीवर ठेवून झोपली.


तेव्हा मेंदूत एक गोडसं, शांत हार्मोन निर्माण झालं — Oxytocin — प्रेमाचं, मायेचं, गोंजारणीचं जादूई औषध.


आजी शांतपणे गाणं गुणगुणत होती, आणि परीच्या चेहऱ्यावर थोडं थोडं हसू परत येत होतं.


तेवढ्यात चिंगी (परीची धाकटी बहीण) नाचत आली —

“आजी! मी पहिल्यांदा पूर्ण कविता लक्षात ठेवली!”


ती गाणं म्हणायला लागली, आणि परी हसली… मोठ्यांदा.


त्या हसण्यात एक वेगळंच समाधान होतं – हवंहवंसं काहीतरी.

ते म्हणजे Dopamine – एखादं achievement पाहिल्यावर मेंदूत येणारं गोड वाटण्याचं केमिकल.


आजीनं दोघींनाही मिठीत घेतलं, आणि म्हणाली,

“तुमचं गाणं, तुमचं हास्य… हेच माझं औषध!”


मनं मोठं करायला औषध लागत नाहीमाणसं लागतात.


Oxytocin म्हणजे स्पर्श, माया, आणि गोंजारणीचं औषध.

Dopamine म्हणजे प्रेरणा, साधलेली यशं, आणि गोड वाटणं.

हे दोन्ही घरातच मिळतात — फक्त कुणीतरी आजी, किंवा एक हसरी बहीण लागते!”

Comments

Popular posts from this blog

काकूंनी दिलेला हळदीचा चहा

आईच्या हातचं लिंबूपाणी रिचार्ज

मामीचं वाफारलेलं पाणी – सौंदर्य आणि स्वच्छतेची सिक्रेट रेसिपी