आजीचं झोपायचं तंत्र
प्रिया रात्री उशिरा पर्यंत मोबाईल स्क्रोल करत बसायची. झोप यायची नाही. डोळे थकलेले, मन उशापाशीही धावपळ करत असायचं.
तेव्हा एक दिवस तिला आजीच्या आवाजाची आठवण झाली –
“झोप म्हणजे फक्त शरीराचं विश्रांती नव्हे ग, मनालाही थोडं थांबू दे.”
आजी रात्री झोपायच्या आधी गरम दूधात हळद आणि गूळ टाकून प्यायच्या, आणि अंथरुणावर पडल्यावर शांतपणे १० श्वास मोजायच्या.
त्या रात्री प्रियानेही तेच केलं – आणि आश्चर्य! पहिल्यांदाच ती झोपेत हसली.
आजचा छोटासा उपाय:
झोपायच्या आधी १ कप कोमट दूधात १/४ चमचा हळद आणि थोडा गूळ टाका. झोपताना फक्त डोळे बंद करा आणि १० श्वास आत-बाहेर मोजा. मन शांत होईल आणि झोप गाढ लागेल.
Channn!!!🙏
ReplyDelete