आईच्या हातचं लिंबूपाणी रिचार्ज
उन्हाळ्याच्या तापट दुपारी प्रिया शाळेतून घरी यायची, घामाने ओले कपडे, दमलेलं शरीर.
दरवाज्यातून आत शिरताच आईच्या हातात असायचा एक थंडगार गिलास – लिंबूपाणी!
ते प्यायलं की जणू संपूर्ण शरीरात उत्साहाची लाट यायची. आई म्हणायची –
“हे फक्त लिंबूपाणी नाही, बाळा – हे तुझ्या अंगातलं ऊन उतरवणारं औषध आहे.”
तेव्हाही ते अनमोल वाटायचं, आणि आजही ऑफिसमधून दमून आल्यावर प्रियाला आईची आठवण होते – ती आता स्वतःसाठी आणि नवऱ्यासाठी रोज हेच लिंबूपाणी बनवते.
आजचा छोटासा उपाय:
1 ग्लास पाण्यात अर्धं लिंबू, चिमूटभर मीठ, थोडा साखर/गूळ, आणि इच्छेनुसार पुदिना.
ही आहे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट – ऊर्जासंपन्न शरीरासाठी आणि थंड मनासाठी.
Fabulous!!!
ReplyDeleteUseful knowledge
ReplyDelete