रोज सकाळी ताजंतवानं उठायचं गुपित : आजीचं सोप्पं सल्ला
“रोज सकाळी ताजंतवानं उठायचं गुपित : आजीचं सोप्पं सल्ला”
एकदा प्रिया सकाळी उठली तेव्हा ती खूप थकलेली आणि मंद वाटत होती. कामाच्या गडबडीत रात्री उशिरा झोपायची तिला सवय झाली होती. आजीने हसत तिला जवळ बोलावलं आणि म्हणाली,
“बाळा, रोज झोपण्याआधी एक छोटं काम कर — तुळशीच्या झाडाशी ५ मिनिटं बस आणि काही चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार मान.”
प्रियाने आजीचं ऐकलं. ती रोज रात्री तुळशीपाशी बसायला लागली. काही दिवसांतच तिला फरक जाणवला — मन शांत होऊ लागलं, झोप लवकर यायला लागली, आणि सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटायला लागलं.
आज प्रिया सर्वांना सांगते,
“रोज थोडा वेळ तुळशीपाशी घालवा, तुमचं शरीर आणि मन दोन्ही आरोग्यपूर्ण राहील!”
“तुमचं झोपण्याचं गुपित काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये सांगा!”

Comments
Post a Comment