⏰ चिंटूचा पाणी टाइमर😃
⏰ चिंटूचा पाणी टाइमर😃
दुपारची वेळ होती. चिंटू गेम खेळत होता, पण अचानक त्याच्या मोबाईलवर “टिंग टिंग” असा आवाज आला.
आई म्हणाली,
👩 “कसला अलार्म लावलास रे?”
चिंटूने अभिमानाने सांगितलं,
👦 “हा माझा पाणी टाइमर आहे! तो वाजला की मला पाणी प्यायचं असतं. डॉक्टर म्हणालेत ना, रोज पुरेसं पाणी प्यायलं की आपणजास्त स्वस्थ राहतो.”
मीरा लगेच धावत आली, “मला पण अलार्म लावायचाय! मी सुद्धा पाणी टाइमर वापरणार.”
आईने हसून दोघांना ग्लासात पाणी दिलं. 💧🥤
बाबा ऑफिसमधून घरी आले, तेव्हाही पुन्हा टाइमर वाजला.
चिंटू ओरडला — “बाबा, हात धुवा आणि आधी पाणी प्या! हा टाइमर सगळ्यांसाठी आहे!”
बाबा हसत म्हणाले,
👨🦱 “वा! आपल्या घरातला पाणी मिनिस्टर तर तूच आहेस.”
हळूहळू रोज ठरावीक वेळेला सगळं कुटुंब एकत्र पाणी प्यायला लागलं.
आजोबा सुद्धा म्हणाले,
👴 “आता माझ्या चहाच्या कपाइतकंच महत्त्व पाण्याच्या ग्लासाला मिळालंय!”
त्या दिवसापासून पाणी टाइमर फक्त चिंटूचा नव्हता…
तो सगळ्या घराचा आरोग्याचा गुपित मित्र बनला. 💙
✨ लहानशी सवय, मोठं आरोग्य! नियमित पाणी प्या, निरोगी राहा.

Comments
Post a Comment