चेहऱ्यावरची हळद – आणि आजीचा आत्मविश्वासाचा फॉर्म्युला

प्रिया कॉलेजमध्ये असताना तिला एकदा चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागले. ती खूप त्रासलेली आणि अस्वस्थ झाली होती. तेव्हा आजी म्हणाली, “ तुला सगळं मॅडम्ससारखं मिळेल – पण आत्मविश्वास स्वतःला लावायचा असतो … आणि थोडी हळद !” आजीने एक घरगुती उपाय सांगितला – हळद + चंदन + गुलाबपाणी – रोज रात्री चेहऱ्यावर लावायचं. केवळ चेहरा उजळला नाही, तर प्रिया आतूनही उजळली – तिचा आत्मविश्वास वाढला, आणि ती पुन्हा आपल्या हास्याने सगळ्यांना मोहित करू लागली. आजचा छोटासा उपाय: रोज रात्री झोपण्यापूर्वी हळद + चंदन + गुलाबपाणी यांचा लेप चेहऱ्यावर १० मिनिटं लावा. त्वचा उजळते , सूज कमी होते , आणि तुम्ही तुमचं नैसर्गिक तेज टिकवू शकता .